तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
परमेश्वर मुरली चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्यांचे नाव
सोनपेठ : पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांडा येथील तरुण शेतकरी परमेश्वर मुरली चव्हाण यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. नापिकी आणि डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर वृद्ध आई वडिलांना लागणारा दवाखाना आणि नुकत्याच झालेल्या पावसाने शेतीतील पिकाचे झालेले नुकसान या गोष्टी प्रकर्षाने त्यांनी मित्रांना बोलून दाखवल्या होत्या.
पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांडा येथील तरुण शेतकरी परमेश्वर मुरली चव्हाण यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. नापिकी आणि डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर वृद्ध आई वडिलांना लागणारा दवाखाना आणि नुकत्याच झालेल्या पावसाने शेतीतील पिकाचे झालेले नुकसान या गोष्टी प्रकर्षाने त्यांनी मित्रांना बोलून दाखवल्या होत्या. कमी शेतीत कष्ट करुन उत्पन्न काढणारा तरुण शेतकरी म्हणून परमेश्वरची परिसरात ओळख होती.दरम्यान त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी शोभा,तीनवर्षीय मुलगा अजय, एक भाऊ असा आपत्य परिवार पाठीमागे आहे.जास्तीच्या पावसाने हातचे पीक जात असल्याची विवंचना हा महत्वाचा प्रश्न सद्या शेतकऱ्यांसमोर असून शेतकरी आत्महत्या वाढताना प्रशासनाने तत्काळ शेतीचे पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी आनंदनगरचे सरपंच विजय पवार यांनी केली आहे.