जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर करा महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देवून केली मागणी .
मोलगी( प्रतिनिधी ) रविंद्र पाडवी
९ ऑगस्ट २०२१ रोजी जागतिक आदिवासी दिन येत असतो या दिवशी जाहीर सुट्टी नसल्याने आदिवासी कर्मचारी अधिकारी यांना अनेक समस्या निर्माण होतात आदिवासी विश्व दिवस ह्या दिवसाची सुट्टी असणे हा आदिवासी हक्क आहे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासीच्या सनमानार्थ ९ आगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे देशभरात व महाराष्ट्रात ९ आगस्ट हा आदिवासी दिन म्हणुन साजरा केला जातो राजस्थान सरकार सह अनेक राज्यात नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आदिवासी दिनानिर्मित राज्यात, जिल्हायात, तालुक्यात गावात आदिवासी सांस्कृतिक देखावे रॅली, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते एवढेच नाही तर काही जिल्ह्यात आदिवासीचे हक्क व अधिकारासाठी आंदोलन व मोर्चा काढले जातात यासाठी ९ ऑगस्ट रोजी सार्वजनिक शासकीय सुट्टी मिळणे अत्यत आवश्यक आहे त्यासाठी निर्णय घ्यावा तसेच मा जिल्ह्यधिकारी साहेब नंदुरबार यांनी सुट्टीचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटना तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविंद्र सना पाडवी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटना तसेच नवापुर तालुका सचिव अनिल वळवी, अर्जुन वसावे तसेच सदर निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब यांना ई मेल द्वारे सुध्दा पाठवण्यात आले आहे.