आपटी येथील युवकांचा मनसे पक्षात प्रवेश….
पंकज नेहारे
मारेगाव / प्रतिनिधी: मारेगाव तालुक्यातील आपटी येथील युवकांनी मोठ्या संख्येने मनसे पक्षात प्रवेश केला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपटी येथील युवकांनी मोठ्या संख्येने मनसे पक्षात प्रवेश केला आहे. प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे व लाभेश खाडे यांच्या शुभ हस्ते हा छोटेखानी कार्यक्रम
झाला. प्रसंगी बोलताना मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी पक्षाची ध्येयधोरणे ,पक्षाची कामाची पद्धती, राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र, याबाबत मार्गदर्शन केले .पक्षातील कामाचे अनुभव पंधरा वर्षातील जनसामान्यांसाठी चा लढा असे बरेच विषय सांगितले गेले. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ,जनसंपर्क वाढवायचा आहे. गाव येथे शाखा वाढवायची आहे तरच पक्ष वाढ शक्य आहे. असे उंबरकर म्हणाले. आपटी येथील उपसरपंच हनुमान बावणे यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गोरगरीबांचे प्रश्न सोडवणारी संघटणा या दृष्टीने आपण मनसे पक्षाला पसंती दिली. गोरगरीब सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे उपसरपंच हनुमान बावणे म्हणाले यावेळी उपस्थिती रूपेश ढोके, रोशन शिंदे , संजय आसमवर किशोर मानकर चांद बहादे आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.