Type Here to Get Search Results !

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने नवविवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने नवविवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या
   
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरा विरुद्ध  कळंब पोलिसांनी केला  गुन्हा दाखल.

कळंब (तालुका प्रतिनिधी) येथिल गार्डन चौकामध्ये राहात असलेली नवविवाहित महीला सौ. आचल सतीश बकाले  वय २१ वर्ष हीचा प्रियकर असलेला आरोपी शैलेश संतोष शेलेकार वय २५ वर्ष रा. माणीकवाडा (धनज)ता.नेर याने लग्नास नकार दिला म्हणून दि. २६ जुलै २०२१ चे सायंकाळी ६ वाजता घराचे स्वयंपाक खोलीत आड्याला ओढणी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 
          प्राप्त माहिती नुसार मृतक सौ. आचल शंकरराव पोजगे वय २१ वर्ष हीचे आरोपी शैलेश संतोष शेलेकार ह्याचे सोबत लग्नाच्या आधीपासुनच प्रेमसंबंध होते. त्यानंतर मृतकचे वडीलांनी समाजाच्या रीतीरिवाजांप्रमाणे देवळी तालुक्यातील पडेगाव (अडेगाव), जि. वर्धा येथील युवक सतिश बकाले  वय २५ वर्ष याचे सोबत दि. २२ मे २०२१ रोजी लग्न लाऊन दिले असल्याने ती सासरी गेली होती. मात्र त्यानंतर शैलेश याच प्रेम अधिकच वाढत जाऊन वारंवार तीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या सोबत लग्न करतो तु परत येत म्हणून फोनवर आणाभाका देत होता.त्यामुळे नवविवाहिता सौ. आचल हीला दि. २३ जुन २०२१ रोजी फोन करून राळेगावला बोलाविले ती आली मात्र त्यानंतर मी तुला ठेवण्यास तयार नाही व तुझ्या सोबत लग्न करीत नाही म्हणून सांगितले. त्यानंतर घडलेला किस्सा घरी आई-वडीलाला सांगीतला त्यामुळे वडीलांनी आमच्या मुलीला ठेऊन घे तीचे सोबत लग्न कर आमची काही हरकत नाही असे म्हटले तरी प्रियकर शैलेश ऐकण्यास तयार नव्हता. तेंव्हा पासून मुलगी महीनाभऱ्यापासुन आई-वडीलांकडे राहात होती. व मानसिक दडपणाखाली येऊन "ना घरकाम ना घाटका" अशी तीची अवस्था झाल्याने दि. २६ जुलै चे सायंकाळी वडील बाहेर गेले असता तीची आई व ती घरी होती आई अंगणात बसुन असल्याचे पाहून मृतकने घरातील स्वयंपाक खोलीचे दार लावून ओढीने घराचे आड्याला गळफास लावून
 पाहून मृतकने घरातील स्वयंपाक खोलीचे दार लावून ओढीने घराचे आड्याला गळफास लावून घेतला सदर बाब आईचे लक्षात आल्याने तीला फासावरुन सोडले व कळंब ग्रामीण रुग्णालय नेले असता डॉक्टरने मृत घोषित केले. सदर घटनेची फिर्याद मृतकचे वडील शंकरराव दिगांबरराव पोजगे वय ४० वर्ष रा. गार्डन चौक कळंब यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार  दिल्याने आरोपी शैलेश संतोष शेलेकार याचे विरुद्ध कलम ३०६ भादवि चा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी घटना स्थळाला भेट दिली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सारिका मरकाम करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies