भाजप सरकार विदर्भ द्या अन्यथा विदर्भातून चालते व्हा
वामनराव चटप:वणी येथील बैठकीत प्रतिपादन
यवतमाळ
रोहन आदेवार/जिल्हा प्रतिनिधी
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती त्वरित व्हावी,कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे व पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे 9 ऑगस्ट 2021 ला विदर्भ चंडिका मंदिर,शहिद चौक नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भवादी नेते,माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांनी सोमवारल विश्राम गृह वणी येथे विदर्भावादयाच्या बैठकीत माहिती दिली.
या आंदोलनाला संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवादी ठिय्या आंदोलनात सामील होणार आहे 9 ऑगस्ट ला विदर्भ चंडिका देवीला साकडे घालून महाआरती करून दुपारी 1 वाजता ठिय्या आंदोलनला शुभारंभ होईल 1997 ला भाजपच्या कार्यकारिणी मध्ये भुवनेश्वर ला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला परंतु अटलजीनी उत्तरांचल,छत्तीसगढ,झारखंड या तीन राज्याची निर्मिती केली परंतु विदर्भ दिला नाही विदर्भाच्या जनतेवर तेव्हाही भाजपने अन्याय केला. कोरोना महामारी मुळे उद्योग व्यापार व्यवसाय बंद असल्यामुळे रोजगार नाही क्रयशक्ती संपली म्हणून कोरोना काळातील वीज बिल राज्य सरकारने भरावे व 200 युनिट वीज फ्री करून ननंतरचे वीज दर निम्मे करावे ही आमची आग्रहाची मागणी आहे पेट्रोल डिझेल गॅस प्रचंड वाढल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणितच बिघडले आहे या किमती त्वरित मागे घ्यावा भाजपाने कबूल करूनही व सद्या सत्तेमध्ये असूनही सुद्धा विदर्भ न देऊन विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केली आहे तसेच काँग्रेसनेही कबूल करून 60 वर्ष सत्तेत राहूनही त्यांनीही विदर्भ दिला नाही यांनीही विदर्भाला धोका दिला आहे 9 ऑगस्टचे हे क्रातीदिवसापासून सुरू होणार ठिय्या आंदोलन विदर्भास्तरीय आहे भाजपच्या केंद्र सरकारने विदर्भ न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आमचा नारा आहे भाजप सरकार विदर्भ द्या अन्यथा चालते व्हा भाजप सरकार चले जावं 9 ऑगस्टला चले जावंची घोषणा करून ठिय्या आंदोलन सुरु होईल अशी माहिती वामनराव चटप यांनी दिली यावेळी या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रा पुरुषोत्तम पाटील, रफिक रांगरेज,देवराव धांडे,राहुल खारकर, राजू पिंपळकर,बाळासाहेब राजूरकर,आकाश सूर,मंगेश रासेकर,संजय चिंचोळकर,शालिनीताई रासेकर,मंदा बांगरे,दशरथ पाटील,राहुल झट्टे,होमदेव कनाके, देवा बोबडे,अनिल गोवरदीपे,संध्या रामगिरवर,पुरुषोत्तम निमकर,सुरेखा वडीचार,सुषमा पाटील,अल्का मोवाडे,यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते