राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी स्वप्नील वाटकर यांची नियुक्ती
जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ/रोहन आदेवार
यवतमाळ: स्वप्नील वाटकर हे नाभिक समाजातील जनसामान्यांना मदत करण्यासाठी सतत धडपड करत
असतात व पक्षाच्या समाज कार्याला गती मिळावी यासाठी त्यांची राष्ट्रीय जनसेवा पक्षात यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. या निवडीने समाजात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महावीरजी गाडेकर, साहेब उपाध्यक्ष संजयजी पंडित साहेब, गोपीनाथ जी बिडवे यांच्या नेतृत्वाखालील स्वप्नील वाटकर यांची निवड करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली अजाबराव चीनचोलकर,प्रकाश आंबेकर,सुरेश भाऊ मांडवकर, बंडू भाऊ ऐसेकर,विनोद आगाशे, प्रशांत पवार,आदी कार्यकर्ते च्यामार्गदर्शना खालील सर्वानुमते निवड करण्यात आली
राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सकल नाभिक समाज यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा,देण्यात आल्या.