खुर्शीद इकबाल मगदूम सईद अहमद यांचे निधन
यवतमाळ येथील शिंदे नगर रहिवाशी खुर्शीद इकबाल मखदूम सईद अहमद यांचे दुर्धर आजाराने काल दि२३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दुखत निधन झाले.मृत्यु वेळी त्यांचे वय ५६ होते.खुर्शीद ईकबाल हे यवतमाळ जिल्हा न्यायालयन्तर्गत येणारे उमरखेड़ सेशन कोर्ट मध्ये वरिष्ठ बेलिफ़ या पदावर
कार्यरत होते.त्यांच्या पश्चात आई,२ पत्नी मुली ,दोन भाऊ ,बहिनी व मोठा आप्त परिवार आहे.ते कांग्रेसचे पदाधिकारी जावेद अख्तर व पत्रकार शाकिर अहमद यांचे ज्येष्ठ बंधु होते. २४ जुलै रोजी सकाळी ११वाजता त्यांच्या शिंदे नगर येथून अंत्यविधीसाठी प्रेतयात्रा निघणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्या कडुन माहिती दिली.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.