वेगाव विठ्ठल मंदिरा समोरून दुचाकी चोरी
पंकज नेहारे
मारेगाव (प्रतिनिधी): मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील विठ्ठल मंदिर शेजारी लावलेली दुचाकी ६जुलै रोजी चोरीला गेली असता दोन दिवस दुचाकीचा तपास केला असता आजुबाजुच्या नातेवाईक व मित्रमंडळी कडे शोध केला मात्र दुचाकीचा लागला नसल्याने ९जुलै रोजी अमोल वसंता गवारकर वय २७ यांनी . याप्रकरणी मारेगाव पोलीसात तक्रार दिली असता ९जुलैच्या सांयकाळी पोलीसांनी अज्ञाताविरोधात ३७९ कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
दुचाकी एमएच २९ ए.जे.२४६८ही ,विठ्ठल मंदिरा शेजारी दुचाकी लावली असता. दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. अमोल गवारकर यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, दुचाकी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.