अतिवृष्टीचा बळीराजाला फटका ...!
रात्रीपासून कोसळणार्या पावसामुळे शेती, रस्ते , पूल पाण्याखाली.
वाहतूक ठप्प...!
जनजीवन विस्कळीत...!
उमरखेड तालुक्यासह मुळावा परिसरात काल दिवसभरा पासून कोसळणार्या पावसामुळे मुळावा परिसरातील शेती, रस्ते आणि पुलाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
उमरखेड तालुक्यात गत काही दिवसापासून झालेला पाऊस हा शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त आहे पण तालुक्यात पर्जन्यमापक यंत्र आहे तरी कुठे ..?
बंद आहेत की चालू आहेत. प्रत्येक महसूल मंडळात एक तरी पर्जन्यमापक यंत्र चालू अवस्थेत असायला पाहिजे पण ते कुठे आहेत. त्याचे दररोजची माहिती कोण ठेवतो हा प्रश्न आहे. शेतकरी विमा कंपनीकडे तक्रार करण्यास गेलो असता शंभर मिलिमीटर पाऊस झाला नाही असे विमा कंपनीचे कर्मचारी सांगतात. तालुक्यात सध्या कुठल्याही रस्त्यावरील पूल नदी नाले,ओढे पूर्ण शक्तीनिशी,दुथडी भरून वाहत आहेत.
मुळावा ते उमरखेड मार्गावरील दहागाव जवळील नालाडी नाल्यावरून पाणी वाहत आहे असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
उमरखेड तालुक्यात काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाले,पूल यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे जाहीर आव्हान करण्यात येते की पुलावरुन पाणी वाहत असताना कोणीही पुल क्रॉस करू नये. पुलावरील पाणी ओसरल्यानंतर जावे तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर संबंधित पटवारी तलाठी मार्फत पिकाचे पंचनामे करण्यात येतील. कोणीही घाबरून जाऊ नये. तहसीलदार यांनी सांगितले आहे