भरधाव आयशरची मिनी ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात चार जण जागीच ठार तर ३ गंभीर जखमी
सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हल्स आणि आयशरचा भीषण अपघात
वाशी : सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर (ता.२२) जुलै रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास मिनी ट्रॅव्हल्स आणि आयशर चा भीषण अपघात घडला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. मृतांची नावे शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बच्याव,जगदीश चंद्रकांत दरेकर,सतीश सूर्यवंशी ह्या चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर संजय बाजीराव सावंत,भरत ज्ञानदेव पगार,गोकुळ हिरामण शेवाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर (ता.२२) जुलै रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास मिनी ट्रॅव्हल्स आणि आयशर चा भीषण अपघात घडला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. मृतांची नावे शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बच्याव,जगदीश चंद्रकांत दरेकर,सतीश सूर्यवंशी ह्या चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर संजय बाजीराव सावंत,भरत ज्ञानदेव पगार,गोकुळ हिरामण शेवाळे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील सर्वजण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असून तिरुपती दर्शनासाठी जात असताना वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील माऊली हॉटेल समोर अपघात घडला. ट्रॅव्हल्स क्रमांक ( एमएच-४१ एयू १५५४) ट्रॅव्हल्सचे टायर पंचर झाल्याने रस्त्याच्या बाजूला गाडी उभा केली होती. पंचर काढत असतात पाठमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ( एमएच-२० ईजी १५१७ ) क्रमांक या आयशर गाडीने मिनी ट्रॅव्हल्सला जोरात धडक मारली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्स गाडी रस्त्यापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर जाऊन पडली तर आयशर गाडीही पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे व पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्ग प्राधिकरण चे कर्मचारी रुग्णवाहिके सह घटनास्थळी दाखल झाले. व मृतांना शवविच्छेदनसाठी येरमाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. पुढील तपास सपोनि गणेश मुंढे करत आहेत