विहिरीत उडी घेवून २७वर्षीय तरूणाचा मुत्यु
.....सचिन महाजन
बांबर्डा गांगापूर शेत शिवारातील घटना 27 जुले हिंगणघाट तालुक्यातील बांबर्डा येथील अविनाश गोसावी कुरसंगे (२७) याने २६ जुलै सायंकाळच्या 5 च्या दरम्यान गांगापुर तो बामर्डा गावाला जात असताना तो शेतामध्ये आपल्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उडी घेतली त्यात तो बाहेर आलाच नाही व अंत झाले , रहिवाशी बांबर्डा येथील अविनाश गोसावी कुरसंगे (२७) यांचे बांबर्डा - गांगापूर शेतशिवारात सरकारकडून सिलिंगमध्ये भेटलेले अडीच एकर शेत असून २६ जुलै गांगापुर गावाकडून आपल्या बांमर्डा गावाकडे जात होता व तो आपल्या शेतात गेला परतीच्या वेळेस त्याला विहिरीचे भरगच्च पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही त्यातच त्याने विहिरीतील पाण्यात उडी घेतली मात्र विहिरीचा आकार गोल झऱ्या असल्यामुळे वरती आलाच नाही , त्याला बाहेर निघता आले नाही, त्यातच गटयागळा घात त्याचा पाण्यात बुडून अंत झाला.याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ,तोपर्यंत त्याचा अंत झाला होता. याबाबतची माहिती वडनेर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वडणेर येथे ग्रामीण रुग्णालयात येथे पाठविला.पुढील तपास वडणेर पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास लक्ष्मण केंद्रे, अमित नाईक जमादार पोलीस कर्मचारी करीत आहे.