विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
हटवांजरी येथील घटना
पंकज नेहारे
हटवांजरी येथील शेतकरी देवराव लटारी फरताडे वय वर्ष (३५) हे २६ जूलै रोजी राहत्या घरी विष प्राशन केल्याने घराच्या सदस्यांच्या लक्षात येताच रात्रीच्या ९ वाजण्याच्या सुमारास देवराव लटारी फरताडे हे विषारी द्रव पिल्याने अत्यवस्थ पडलेले दिसून आले. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्लाने चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असता चंद्रपूर येथील उपचार सुरू असतानाच सांयकाळच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचाही दावा नातेवाइकांनी केला. देवराव फरताडे यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे