Type Here to Get Search Results !

उमरखेड येथील सहस्त्रकुंड धबधबा प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

उमरखेड येथील सहस्त्रकुंड धबधबा प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

उमरखेड(प्रतिनिधी)

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका सिमेवर वसलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत आहे,मान्सून कालावधीत धरण, तलाव, धबधबा मधील “ओव्हर फ्लो" दृश्य पाहण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्या जात आहे.
     मागील पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधबा “ओव्हर फ्लो" पाहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नी दाम्पत्याची तोल गेल्यामुळे मृत्यु झाला होता होता, अशा प्रकारच्या घटना यावर्षी होवू नये याकरीता जिल्हयातील मोठे व मध्यम प्रकल्प तसेच सहस्त्रकुंड धबधबा परिसर,दि 23 जुलै ते 1 ऑगष्ट पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
       जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर क्षेत्रात प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी तसेच शोध बचाव पथक याशिवाय इतरांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आले आहे,या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम नुसार कार्यवाही करण्यात येणार
असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    *फोटो*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies