Type Here to Get Search Results !

देशी कट्ट्याच्या धाकावर दहशत; अवधूतवाडी पोलिसांनी केली दोघांना अटक

देशी कट्ट्याच्या धाकावर दहशत;  अवधूतवाडी पोलिसांनी केली दोघांना अटक 

यवतमाळ पोलीसाची कारवाई

यवतमाळ : देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जवळ बाळगून सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या डिबी पथकाने आर्णी मार्गावरील वाघाडी पेट्रोलपंपावर केली.शिवम ढवळे (वय २१),
अभिनव लांडगे (वय २० रा. सावर, ता. बाभूळगाव), अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरुद्घ अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.  न्यायालयाने आरोपींना शनिवार (ता.17) पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात डिबी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies