Type Here to Get Search Results !

वरपोड येथील महिलेला मारहाण करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करा.

वरपोड येथील महिलेला मारहाण करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करा.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन पाठवून आदिवासी कोलाम जमातीची  मागणी

   सचिन मेश्राम

झरीजामणी तालुक्यातील वरपोड येथील आदिम जमात      कोलाम समाजाच्या महिलांना मारण्याचा अधिकार नसताना सुद्धा अधिकाराचा गैरवापर करून पोलिस व वन विभागाच्या अधिकारी यांनी अमानुष मारहाण करणाऱ्या दि. १९/६/२०२१रोजी वनविभाग पांढरकवडा व पोलीस कर्मचारी यांनी वरपोड येथे वाघच्या  शिकारीचे संशायित आरोपींना पकडण्या करता कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. परंतु वर पोड  हे गाव अनुसूची ५ नुसार यवतमाळ जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला आहे आणि सदर गाव पेसा
कायदा अंतर्गत येत असल्यामुळे रीतसर ग्राम पंचायती ची परवानगी घेणे बंधन कारक असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.आणि रात्री ३:००वाजताच्या दरम्यान सदर गावाला पोलीस विभाग व वन विभाग यांनी  वरपोड या गावाला बाहेरून घेरा टाकला.रात्री कोणाच्याही घरी घाड टाकायची असेल तर  न्यायालयाची परवानगी घेणे बंधन कारक आहे. परंतु सदर विभागाने ती परवानगी सुद्धा दाखवली नाही. एखाद्याच्या घराची झडती घ्यायची असेल तर सर्च वारंट द्यावा लागतो. परंतु ती सुद्धा कार्यवाही वन विभाग व पोलीस विभागाने केले नाही. सदर आरोपींना अटक करण्याकरीता कोणत्याही प्रकारचा पुरावा दाखवला नाही. संशायित आरोपींना यांना रात्री५:००वाजता धरपकड करत असताना.घरच्या महिलांनी वन विभाग व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता महिलांना बेदम अमानुष्या मारहाण करण्यात आली. यात एक गर्भवती महिला व अल्पवयीन मुलीला बेदम पणे मारहाण करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल भाग आहे.यात वाघाच्या हमाल्या मध्ये अनेक वेळा कोलाम समाजाचे व्यक्तीच गंभीर जखमी व मुत्यु झाले आहे.आणि वाघाच्या हल्ल्यामध्ये कोलाम समाजाची व्यक्ती व महिला  मृत्यू झाले आहे. कोलाम समाजाच्या एखाद्या व्यक्तीवर वाघाने हमला करून ठार मारले तर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी कधी दाखल होत नाही. आणि वाघाची शिकार झाली म्हणून त्यांना सर्व शासनाचे नियम पायदळी तुडवून आदिम समाजाच्या महिलांना अधिकाराचा गैरवापर करून बेदम पणे  मारहाण करण्यात आली  यात मानव आयोग अधिकाराचे सुद्धा उल्लंघन  केले असून मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये रितसर वरपोडच्या महिलांनी तक्रार दाखल केली असता  उपविभागीय अधिकारी पोलिस विभाग वणी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करुन जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना सुद्धा  प्रकरणा संदर्भात निवेदन देवून बैठक घेतली असता त्यांनी ही याप्रकरणी उडवाउडवीची उत्तर देऊन कोणतेही कार्यवाही केली नाही.
 आदिम जमात कोलाम समाजाच्या महिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकारी  वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून.  निलंबित करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातू करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies