Type Here to Get Search Results !

२४वर्षीय युवकाच्या घरी पोलिसांनी धाड टाकून धारधार शस्त्रसाठासह युवकास अटक

 २४वर्षीय युवकाच्या घरी  पोलिसांनी धाड टाकून धारधार शस्त्रसाठासह  युवकास अटक

अंजनगाव सुर्जी  (प्रतिनिधी)

  शहरातील बालाजी प्लाॕट मधील एका २१ वर्षीय युवकाच्या घरी शस्त्रसाठा सापडला ने अंजनगाव सुर्जी शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, अंजनगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज  दि.२४ ला दु १ वा. चे दरम्यान चेतन चंदू चंदनपत्री वय २४ रा. बालाजी प्लॉट अंजनगाव सुर्जी याचे घरी अंजनगाव पोलिसांनी धाड टाकली  असता सदर युवकाच्या घरून ५ तलवार,८जांबीये व २ कातियार जप्त करण्यात येऊन पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे.
हकीकत अशी की, दोन दिवसा पूर्वी विक्की वानखडे(२२) नामक एक युवकाने  एका कॅन्टींग मध्ये तलवार हाती घेऊन बसलेला फोटो फेसबुकवर अपलोड केला. ही तलवार अजय अशोक आसलकर (२४) काठीपुरा अंजनगाव याची होती.   फोटो फेसबुक वर अपलोड होताच  पीएसआय सपकाळ यांनी शोध घेतला असता विक्की वानखडे याचे जवळून पंच गजानन हुरपडे व श्रीकांत नाथे यांचे समक्ष नवीन बस स्टॅन्ड पारिख यांच्या पेट्रोल पंप जवळून  एक तलवार व विक्की याचे बायांना वरुण चेतन चंदनपत्री याच्या घराची झाळती घेटली असता चार तलवार व दहा निरनिराळे चाकू सापळले असून विक्की वानखडे,अजय आसलकर,चंदू चंदनपत्री यांचेवर आर्मस् अॕक्ट ४,२५ नूसार गुन्हा दाखाल करण्यात आले आहे.
आरोपीच्या बयानावरुन चेतन हा ही शस्रे आॕनलाईन विकत घेत होता आणि त्याची विक्री गावात करित असल्याचे समजते, ज्यावरुन आणखीही शस्रे शहरात मिळुन येण्याची चर्चा आहे.
चेतन चंदनपत्रीला काही दिवसाअगोदर  आॕनलाईन आंतरराष्ट्रीय दर्जाचा योगामधील पुरस्कार मिळाला होता हे विशेष.
सदर कर्यवाही पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांचे मार्गदर्शनात पीएसआय सपकाळ, पीएसआय मंजुषा ढोले, पीएसआय इम्रान इनामदार, पीसी पवन 304, पीसी सरफराज वाहन चालक भूषण तयावाडे यांनी केली.असून शहरात वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies