Type Here to Get Search Results !

अबब..सासऱ्या कडून जावयाला मारहाण पोलीसात सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल

अबब..सासऱ्या कडून जावयाला मारहाण  पोलीसात सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा:- पुण्याहून पत्नीला घेण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय जावयाला सासऱ्या लोकांनी मारहाण केल्याचा घृणास्पद प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे घटली असुन.जावयाच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचून मारहाण करण्यात आल्याची तक्रार जावयाने बोरखेडी पोलिसात केली दिली असून सासऱ्याकडील  ११ लोकावर सांयकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल केल असुन ११आरोपी पैकी ४आरोपींना  अटक करण्यात आली असून
 पुणे जिल्ह्यातील जुन्नर कबाडवाडी येथील २२ वर्षीय पीडित विवाहित युवक हा त्याच्या पत्नीला  सासुरवाडीला नेण्यासाठी  ४ जुलैला बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील कॉटन मार्केटन येथे असलेल्या सासऱ्याच्या घरी आला होता.यावेळी मोताळा येथील रहवासी आरोपी रामराव भाऊराव पवार,विजय रामराव पवार,रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते  या ११ जणांनी  सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले. व पीडित युवकाच्या अंगातील फुलपॅन्ट व अंडरवेअर काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचले.शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी,केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे लज्जा वाटून खूप वेदना झाल्या.अशी तक्रार पीडित युवकाने तक्रारी बोरखेडी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पीडित जावायाच्या तक्रारीवरून  ११ आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून ४ लोकांना अटक करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies