आता विजेच्या बिलाचे सिम कार्डप्रमाणे रिचार्ज करावे लागणार ! - राज्य सरकारचा मोठा निर्णय
स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत काल ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी निर्देश दिले आहे - त्यानुसार राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यात येतील
सध्या प्राथमिक स्तरावर मुंबई ,नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या शहरात स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार - मोबाईलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध होतील
यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल म्हणजेच वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये जितके पैसे जमा असतील त्यानुसारच वीज वापरता येईल तसेच मीटरमध्ये छेडखानी करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल त्यामुळे वीजचोरीस आळा बसेल - असे राज्य सरकारने सांगितले
राज्य सरकारने स्मार्ट मीटर बाबत घेतलेला हा निर्णय आपल्यासाठी नक्कीच खुप महत्वाचा आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील शेअर करा