पत्रकारांनी दिले
जिल्हाधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का अभियंता यांना निवेदन
यवतमाळकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची केली मागणी
यवतमाळ दि.२० मे -: येथील काही परिसरात मागील अनेक वर्षांपासून जीवन प्राधिकरण विभागाव्दारा गाळयुक्त अशुद्ध पाणीपुरवठा केल्या जात आहे.हा गंभीर प्रकार तात्काळ बंद करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन,येथील पञकारांनी आज दि.२० मे रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जाधव यांना प्रत्यक्ष
अलिकडे यवतमाळ शहराचा विस्तार मोठया प्रमाणात वाढला,त्याचप्रमाणात नळजोडणीची मागणी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागावरील ताण सुद्धा वाढला आहे. परिणामी मागील काही वर्षांपासून , यवतमाळ शहरात नव्याने समावेश झालेल्या नवीन व जुना उमरसरा भागातील अनेक काॅलन्यांसह विविध नगर व परिसरात गढूळ -- (गाळयुक्त) पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा नळाच्या पाण्यातून नारू, चामडोकसारखे जीवजंतु सुद्धा येतात.सदर पाणी पिण्यायोगय नसतानाही,संबंधित नळधारक नागरिकांना नाईलाजाने तेच गाळयुक्त अशुद्ध पाणी पिणे भाग पडत आहे.या गंभीर प्रकाराकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. शेवटी आज २० मे रोजी, येथील पञकारांनी जिल्हाधिकरी येडगे व जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता जाधव यांना प्रत्यक्ष भेटून, ही समस्या लक्षात आणून दिली. व सदर परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा तात्काळ करावे अशी मागणी केली.यावेळी तात्काळ कारवाई करून, संबंधित नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी येडगे व कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी दिले.निवेदन देताना पञकार रघुवीरसिंह चौहान,उल्हास निनावे, संजय सावरकर,विजय बुंदेला,सुकांत वंजारी, किशोर जुननकर, मकसूद अली इत्यादि पञकार उपस्थित होते.