मारेगाव तालुक्यात १३ पॉझिटीव्ह
- शहरात दोन...५२ जन झाले बरे!
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यात कोरोना संसर्गात आज पुन्हा पॉझिटीव्ह चा आकडा कमीवर आला आहे.दिवसागणिक रुग्णात घट होत असतांना हे दिलासादायक चित्र मारेगाव तालुक्यासाठी सुटकेचा श्वास ठरत आहे.
मारेगाव तालुक्यात आज गुरुवार ला प्राप्त अहवालात एकूण १३ जन बाधीत निघाले.यात मारेगाव शहराचा आकडा मागील दोन दिवसापासून जैसे थे ठेवत दोन वर आहे.दरम्यान आज ५२ जन बरे झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाकडे झाली आहे.
तालुक्यात कोरोना संसर्गाची ओसरत असलेल्या आकडेवारी वरुण तुर्तास समाधान व्यक्त होत असले तरी जनतेंनी गाफील न राहता शासनाने ठरविलेले नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन स्थानिक प्रशासना कडुन करण्यात आले आहे.