मारेगाव तालुक्यातील टाकळी येथे कोरोना शिबीर संपन्न शिबिरात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गावातील 50% नागरिकांनी केली तपासणी
मारेगाव वार्ता/जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
मारेगाव: तालुक्यातर्गत येणाऱ्या
टाकळी ग्रामपंचायत येथे दिनांक 18 मे
2021 ला विषेश कोरोना चाचणी
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
संम्पूर्ण जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले
आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेक निष्पाप
लोकांचा बळी जात आहे. सामान्य लोकांना
इंजेक्शन, बेड,ऑक्सिजन मिळत नाहीत, अशा
गंभीर परिस्थितीतुन संपूर्ण जग जात आहेत.
अनेकांना ताप, सर्दी,खोकला आहे कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक तपासणी न करता घरीच गोळ्या खाऊन झोपणे पसंद करत आहे. त्यामुळे कमी खर्चात या आजारापासून
गावाला मुक्त करण्यासाठी तसेच जे काही
कोरोनाग्रस्त व्यक्ती आहेत त्या व्यक्तींपासून इतर
व्यक्तींना जवळच्या/ कुटुंबातील व्यक्तींना संसर्ग
होण्यापासून वाचविणे व गावची वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन या विशेष 'कोविड19' ची तपासणी करण्यासाठी
"आरोग्य अधिकारी यांचे पथकाद्वारे गावात
कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन टाकळी ग्रामपंचायत येथे करण्यात आले होते. गावकऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून टाकळी गावात जवळपास 50% लोकांनी ही कोरोना तपासणी केली असून यात लहान मुलांनी सुद्धा स्वखुशीने तपासणी केली
या शिबिरात 234 जणांची चाचणी
करण्यात आली असून यात 100 जणांनी Antigen Test तर 134 जणांची RT-PCR Test करण्यात आली तर Antigen Test मध्ये दोन जण पोसिटीव्ह तर 98 जण निगेटीव्ह आले असून RT-PCR Test 134 जणांचे रिपोर्ट यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी साठी पाठविण्यात आले या शिबिराला लॅब टेक्निशियन जीवन तिरणकर, आरोग्य सेवक एच.डी. आत्राम, आरोग्य सेविका एस एम वर्धे, आशा पॅथिलीटर व्ही आर बोंडे यांनी तपासणी केली.
तर सचिव सुनील ताटेवार, पोलीस पाटील संगीता आदेवार, सरपंच प्रेमीला आदेवार, तलाठी घोटकर साहेब, उत्तम आत्राम कोतवाल, आशासेविका पंचफुला खेवले, अंगणवाडी सेविका सिमा गेडाम, मारोती सिडाम यांनी शिबीर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.