वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव स्मशान शांत होण्याचे नावच घेत नाही? मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ
प्रतिनिधी
संदीप मापारी पाटील
बुलढाणा .लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात व शहरात कोरोना रुग्ण वाढत असून मृत्यूची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात स्मशान शांत होण्याची नावच घेत नाही यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
वयोवृद्ध पेक्षा मध्यमवर्गीय ४० ते ४५ वय गटा मधील मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे यामुळे तालुक्यामध्ये विदारक चित्र सध्यातरी दिसत असून मोठ्या प्रमाणात कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाचे रूग्ण आढळत असून संक्रमण नही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे यामुळे प्रत्येकाने आपलं कुटुंब आपली जबाबदारी याप्रमाणे जर सर्व उपाययोजना केल्या व प्रशासनाला सहकार्य केल्यास हे विदारक चित्र थांबू शकते अन्यथा यावरूनही भयानक परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.