मारेगाव कोविड केन्द्रात सुविधा करा
मारेगाव तालुका काँग्रेसचे पालकमंत्री यांना निवेदन देवून केली मागणी
मारेगाव वार्ता
पंकज नेहारे
मारेगाव येथील कोविड केंद्राला अपुरी व्यवस्था असून त्यात सुविधेचा अभाव असुन कोविड केंद्रात सुविधा उपलब्ध करून कोरोना रुग्णांची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात यावी. अशा आशयाचे मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपानजी भुमरे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच मारेगाव तालुक्याचा दौरा केला. यात त्यांनी येथील कोविड केंद्राला भेट दिली. भेटी दरम्यान मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. मारेगाव येथील कोविड सेंटरला असलेल्या अपुऱ्या सुविधा याकडेही लक्ष वेधले. कोविडमुळे जनता भयभीत झालेली असून मृत्यूचे प्रमाणही वाढले असुन येथील कोविड केंद्राला ऑक्सिजनची व्यवस्था असुन पाहिजे त्याप्रामणे नसल्याने. तसेच येथे बेडची सुद्धा पुरेशी व्यवस्था नाही. कोविड रुग्णाला पुढील उपचारासाठी पांढरकवडा ,वणी, यवतमाळ व चंद्रपूर येथे जावे लागते. त्यामुळे मारेगाव येथे ऑक्सिजन तसेच वाढीव बेडची सुविधा कोविड सेंटरला उपलब्ध करून देण्यात यावी.
तसेच मारेगाव तालुक्यातील रस्त्यांची खूपच दैनावस्था झालेली आहे. ग्रामीण भागात तर नागरिकांना वाहतूक करणे किंवा वाहन चालवणे या रस्त्यावरून कठीण होऊन गेलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील या समस्येकडे मा. पालकमंत्री श्री. संदीपानजी भुमरे यांनी लक्ष द्यावे अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.नरेंद्र पा. ठाकरे, जी.प.सदस्या सौ.अरुणाताई खंडाळकर, मारेगाव युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश बदकी व नंदेश्वर आसुटकर यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.