हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम युवकांचे योगदान
जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
यवतमाळ
कोरोना मृतांना शेवटचा अग्नी देण्यासाठी जिथे कुटुंबातील व्यक्ती सुद्धा सरसावत नाहीत. अशा ठिकाणी माणुसकीला जिवंत ठेवणारे उत्तम उदाहरण मुस्लिम युवकांचे अहले सुन्नत खिदमत कमिटी फाउंडेशन चे युवक समोर येऊन पुढाकार घेत असल्याने लोकांच्या काळजात ते जागा मिळवित आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून दररोज २५ ते ४० रुग्ण कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडत आहेत.त्यांचे मृतदेह नातेवाईकांना मिळत सुद्धा नाहित.अंत्यदर्शन सोडाच मग अशा रुग्णांचा अंत्यविधी होतो तरी कसा ? असा प्रश्न समाजाला पडला आहे.
कोरोना मुळे दिवंगताच्या प्रवासाला गेलेल्या रुग्णांना मुखाग्नि देण्याचे काम शहरातील अहले सुन्नत खिदमत कमिटी फाउंडेशन चे अध्यक्ष कासिफ पोठियावाला , उपाध्यक्ष निहाल राजा, सचिव सज्जाद खान यांच्यासह शेख सलीम, शेख अल्ताफ , दानिश खतीब , वाकर अहमद ,मोहम्मद फैजान आणि कृष्णा कोथळकर हे मृत पावणाऱ्या रुग्णांच्या धर्मा नुसार आणि रितिरिवाजानुसार मुखाग्नि देण्याचे महान कार्य उमरखेड शहरात सुन्नत खिदमत कमिटी फाऊंडेशन करत आहेत. शहरात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होऊन बरे झाले. त्यात काही रुग्णा मृत झाले तर नातेवाईकांना देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या पत्रानुसार मृतदेह कुटुंबीयांना देतात.पण मग या मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे ? असा प्रश्न देखील कुटुंबीय समोर उभा ठाकतो. एखाद्या माणसाचे जेव्हा कोरोनामुळे निधन होते तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शना साठी सुद्धा परवाना मिळत नाही.हा अंत्यविधी होतांना जवळपास आपले कोणीही नसते.दूर राहून नातेवाईक केवळ डोळ्यात अश्रू गाळू शकतात. मात्र प्रत्यक्ष अंत्यविधी पार पडणारे हात असतात त्या तरुणांचे.
हे माणुसकीचे दर्शन घडविणारे युवक समाज मनामध्ये आपली जागा निर्माण करत आहेत. माणूस आयुष्यभर जात-धर्म घेऊन मिरवीत फिरतो पण मृत्यूच्या दारात साऱ्याचा विसावा एकाच ठिकाणी असतो.हिदू धर्मानुसार मृतदेहांना विसावा मिळावा यासाठी विसावा टाकण्याची पद्धत आहे.पण कोरोनामुळे हेदेखील शक्य होत नाही. मृतदेह थेट स्मशानभूमीमध्ये नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले जातात.पण माणुसकीच्या नात्याने तरुणांनी हा धोका जीवावर हसत हसत पत्करला आहे. कोणत्याही मोबदल्याची , शाबासकीची किवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता हे तरुण कोरोना मृतावर अंत्यविधी करीत आहे.त्यांच्या अशा सामाजिक बांधिलकी मुळे कुटुंबियाच्या मनामध्ये ते घर निर्माण करून जात आहेत.
विद्यार्थाना मदत करणे, गरिबासाठी राशन पुरविणे , बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे. लहान व्यवसाय उभा करून देण्यासाठी अहले सुन्नत खिदमत कमिटी काम करीत आहे.