Type Here to Get Search Results !

डेडिकेटेड कोविड हेल्थ केंद्राला शिवसेना शहर प्रमुखांची भेट

डेडिकेटेड कोविड हेल्थ केंद्राला शिवसेना शहर प्रमुखांची भेट..

अपुऱ्या व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी

रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी

वणी:येथील ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेन्टर मध्ये नुकतेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ६० बेड असुन त्यामध्ये ऑक्सिजन असलेले २० तर साधे  ४० बेड आहेत. विशेष म्हणजे
ऑक्सिजन असलेल्या २० बेड पैकी एकही ऑक्‍सिजनचा बेड शिल्लक नाही.
तर साधे ४० बेड असुन ते ४० ही बेड खाली आहेत कारण तिथे ना ऑक्सीजन, ना व्हेंटिलेटर त्यामुळे ते बेड खाली आहेत,
यादरम्यान जर एखादी पॉझिटिव रुग्ण दाखल झाले आणि त्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्या रुग्णाला भर्ती कुठे व्हायचे ? असा प्रश्न राजु तुराणकर यांनी भेटीदरम्यान निर्माण केला आहे. 
विशेष म्हणजे यावेळी ग्रामिण रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला, या रुग्णालयामध्ये पेशंट गेल्यानंतर असे म्हटले जाते की, जर तुमची ऑक्सिजन लेवल ९० च्या खाली असेल तरचं तुम्हाला भरती केल्या जाईल! आता पेशंटला वाट पाहावी लागेल की केव्हा त्याची ऑक्सीजन पातळी ९० च्या खाली जाते आणि जर अचानकपणे रुग्णांची तब्येत खराब झाली तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न राजु तुराणकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सद्या शहरासह तालुक्यात कोरोना कोविडचे रुग्ण संख्या वाढत असून मात्र उपाययोजना तोकडी असतांना येथिल राजकारण्यांना फक्त प्रसिद्धिची पडली आहे लक्षात घेऊन ज्या प्रकारात गाजावाजा केला त्या प्रकारात प्रत्यक्षात जेव्हा आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहतो तेव्हा तेथील दृश्य काहीतरी वेगळेच आहे.
यावेळी  उपस्थित अजिंक्य शेंडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख, ललित लांजेवार, माजी युवासेना शहर प्रमुख, मंगल भोंगळे विभाग प्रमुख, जनार्दन थेटे शाखा प्रमुख उपस्थित होते
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies