आंबे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात
बोरी ते किन्ही गावा नजिक घटना
मारेगाव वार्ता
जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
राळेगाव : आंध्रप्रदेशातून उत्तर प्रदेशात आंबे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला. या अपघातात जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असुन चालक जखमी झाल्याचे कळते. हि घटना १ मे रोजी सकाळी ७ वाजता दरम्यान राष्ट्रीय
महामार्गावरील बोरी ईचोड ते किन्ही या गावा दरम्यान घडली.आंध्रप्रदेश जगदयाल येथून उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रसाळ आबे घेऊन जाणाऱ्या आर जे. ११ जी. बी. ०३५० या क्रमांकाच्या ट्रकला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील किन्ही फाट्याजवळ तलावानजीक अचानक
अपघात घडला. या अपघातात ट्रक चालक पवन सिंग गुज्जर किरकोळ जखमी झाला असून ट्रक चालकावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.पुढील तपास वडकी पोलीस करत आहे.