मारेगाव तालुक्यातील विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त; महावितरणाचा भोंगळ कारभार संबंधित विभागाला स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे निवेदन
मारेगाव शहरा सह तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिका सह शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर दुखण्यावर मलमपट्टी लावून महावितरण असल्याचे चित्र दिसत आहे. व महावितरणाचा भोंगळ कारभार अद्यापही सुधारलेला नाही.
मारेगाव वार्ता/जिल्हा प्रतिनिधी
रोहन आदेवार
मारेगाव : तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येवर महावितरणाचा भोंगळ कारभार अद्यापही सुधारलेला नाही. याबाबत स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने संबंधित विभागाला निवेदन देत सर्व समस्यांचे निवारण करावे अन्यथा, महावितरणविरोधात
जनआंदोलन सुरू करू, असा इशारा दिला आहे. यावेळी उपस्थित स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार जिल्हा अध्यक्ष सचिन पचारे, विशाल किन्हेकार राजु खडसे, विजय मेश्राम सोमेश्वर गोडेकार,विकास राऊत,अनिल राऊत,गोपाळ खामनकर,अतुल पचारे लक्ष्मण चावके यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.