कोरोना अपडेट....
मारेगावला भोपळ्याची हँटट्रिक !
तालुक्यात २९ पॉझिटीव्ह
एकाचा मृत्यू
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामिण भागात कोरोनाचा आलेख चढत्या क्रमात आहे.आज प्राप्त अहवालात मारेगाव शहरात पॉझिटीव्ह चा भोपळा आहे.सलग तिसर्या दिवसाला एकही बाधीत नसल्याची नोंद झाल्याने मारेगावने भोपळ्याची हँटट्रिक केली.शहराला तुर्तास दिलासा मिळाला असला तरी तालुक्यात कोरोना संसर्गाने डोके वर काढीत आज मंगळवारला एकूण २९ जन बाधीत केले.
कोरोना संसर्गाने लपंडाव कायम ठेवीत आज ग्रामिण भागातील डोलडोंगरगाव ,डोर्ली,कान्हाळगाव येथील २९ जन पॉझिटीव्ह निघालेत.मारेगाव शहराला तुर्तास दिलासा देत सलग तिसर्या दिवसाला बाधितांचा आकडा शून्यावर आहे.परिणामी आज प्रशासकीय अहवालात कोरोना संसर्गाने मारेगाव येथील एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.
मारेगाव तालुक्यात अँक्टिवचा जंबो आकडा समोर येत १८८ वर पोहचला तर बरे होण्याचे प्रमाण आज रोजी केवळ सात आहे.
परिणामी वाढत्या संसर्गाला आला घालण्यासाठी सजग आणि सतर्क राहण्याची गरज निर्माण होत आहे.