मारेगावात भोपळा , तालुक्यात १३ पॉझिटीव्ह!
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव शहरात कोरोना संसर्गाने आज ऊसंत घेतली आहे.एकही जन बाधीत नसुन तालुक्याच्या ग्रामिण भागात मात्र पॉझिटीव्हचा आकडा तेरा वर आहे.बरे झालेल्यांची संख्या १६ असुन शहराला आज भोपळा मिळाल्याने तुर्तास समाधान व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यातील बाधितांच्या आकडेवारीचा लपंडाव कायम असतांना आज रविवारला १३ जन पॉझिटीव्ह निघालेत.दिवसागणिक कमी अधिक चे प्रमाण असतांना मारेगाव करांना दिलासा देत शहरात आज बाधितांचा आकडा शून्यावर आहे.
परिणामी बरे होण्याचे प्रमाणात वाढ होत असतांना आज १६ जन घरी परतले.मारेगावात सातत्याने होत असलेले रुग्ण संख्येची घट मारेगाव तालुका हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करित असल्याचे दिसुन येत आहे.कोरोना संसर्गजन्य असल्याने जनतेनी सावधगिरी बाळगून कोरोनास वेशीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.