बोदाड: दोन लाखाच्या मोहफुलाच्या दारुवर छापा
संशायितांचा घटनास्थळा वरुण पोबारा
मारेगाव पोलिसांची कारवाई
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यातील बोदाड (केगाव )येथे तळीरामांचे चोचले पुरविण्यासाठी चक्क मोहफुलाचा सडवा मोठ्या प्रमाणात विक्री करित असतांना मारेगाव पोलिसांनी छापा टाकुन किमान दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.घटनास्थळावरून संशायित आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले असुन पोलिसांनी पाच जनाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.ही कारवाई आज रविवारला करण्यात आली.
कोरोना संसर्गाने लॉकडाऊण व संचारबंदी असतांना देशी विदेशी मदिरेची दुकाने बंदवस्थेत आहे.त्यामुळे मदिरा शौकिनांची पुरती वाट लागुन दाम दुपटीने तळीराम गरज भागवित असल्याचे काहीसे चित्र तालुक्यात आहे.अशातच दोन दिवसापूर्वी मार्डी येथे खुलेआम दारु विक्री सुरु असतांना येथील अनुज्ञप्तीधारकास एस.पी.पथकाच्या दणक्याने अती आत्मविश्वास नडला होता.त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा मोहफुलाच्या दारु कडे वळविला.
मार्डी शेजारी असलेल्या बोदाड येथे चक्क ड्राम भरलेली मोहफुलाची दारु तळीरामांचे चोचले पुरवित असल्याची गोपनीय माहिती मारेगाव पोलिसांना लागताच आज रविवारला छापा टाकला.यात ड्रम व डबके भरलेली मोहाचा सडवा व इतर साहित्य असा जवळपास दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.घटनास्थळावरुंंन संशयितांनी पोबारा केला असुन पोलिसांनी पाच जना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.