Type Here to Get Search Results !

मारेगावात पोलिओ लसीचा तुटवडा

धक्कादायक...
लसीकरण अभावी आरोग्य विभागच झाला "पंगू"

मारेगावात पोलिओ लसीचा तुटवडा

🔸 बालके प्रभावित , पालकात असंतोष 
🔸 मातेची तहसील प्रशासनाकडे तक्रार
मारेगाव : प्रतिनिधी
बालकांमध्ये लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येते मात्र मारेगाव येथे हा कार्यक्रमच वांझोटा ठरत असल्याचे वास्तव समोर आले.मागील तब्बल दोन महिन्यांपासून लसीकरण होत नसल्याने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत आहे.परिणामी बालक लसीकरणअभावी प्रभावित होत असून मातेने थेट तहसीलदार यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
     
नुकत्याच जन्मलेल्या बाळांना संभाव्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण करण्यात येते.त्यानुसार आरोग्य विभाग ठराविक दिवसाला लसीकरण करतात मात्र मागील दोन महिन्यांपासून लसीच्या तुटवड्या मुळे तालुक्यातील बालके लसीकरण पासून वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.आरोग्य यंत्रणेच्या बेतालपणाने पालकात असंतोषाची लाट पसरत आहे.
लसीकरण माध्यमातून प्रतिबंध करता येणाऱ्या पोलिओ , घटसर्प , धनुर्वात , डांग्या खोकला ,क्षयरोग आदी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी विस्तारीत लस टोचणी कार्यक्रम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येतेय. मात्र लसीकरणाच्या तुटवड्याने पालकात भितीचे वातावरण निर्माण होत आहे.सर्वसामान्य जनतेला आरोग्य विभागाकडून मोफत देण्यात येणाऱ्या लसीकरणाची ही प्रभावी योजना तूर्तास पंगू बनली आहे. खासगीत या लसीच्या किमतीत मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडते आहे.दरम्यान मागील अनेक दिवसांपासून लसीच्या तुटवड्याने आरोग्य विभागाच्या तकलादू धोरणाचा परिपाक बालकांच्या जीवावर उठत आहे.परिणामी , लसीकरणाची तात्काळ उपलब्धता करून दिलासा द्यावा अशी आर्जव मागणी पालकासह मातांनी केली असून वनिता मुक्तेश्वर दुर्गे रा.मारेगाव या मातेने थेट तहसील प्रशासनाकडे तक्रार केल्याने आरोग्य विभागात खळबळ उडत आहे.

 जिल्हा स्तरावरच लस उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बालके लसीकरण पासून वंचित आहे.हे वास्तव असतांना आम्ही वरिष्ठ पातळीवर वारंवार मागणी करून लस उपलब्ध होत नाही आहे.लस काही दिवसातच उपलब्ध झाली की मातांना बोलावून लसीकरणाची पूर्तता करण्यात येईल.
 अर्चना देठे
तालुका आरोग्य अधिकारी
मारेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies