मागणी....
मारेगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा
आंबेडकर अनुयायी सह मनसे नगरसेवकांचे न.पं. ला साकडे
मारेगाव :- प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा नगरपंचायत समोर उभारण्यात यावा त्यासाठी खुद्द नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार यावा व मारेगावकरांचे भावनिक स्वप्न साकार करावे अशी मागणी मारेगाव येथील आंबेडकर अनुयायी सह मनसे नगरसेवक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून मारेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे केवळ तैलचित्रावर अभिवादन करणे मारेगावकरांच्या नशिबी आहे.नगरपंचायत समोरील जागेवर नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा व शिवप्रेमींना न्याय द्यावा अशी भावनिक साद घालण्यात आली आहे.
नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अनिल गेडाम , नगरसेविका अंजुम शेख नबी , संतोष रोगे , विलास रायपूरे , गजानन चंदनखेडे , चांद बहादे , ज्ञानेश्वर धोपटे , रमेश सोनूले ,लाभेश खाडे , निखिल मेहता , आकाश खामनकर यांचेसह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.