🔸वणी आगार व्यवस्थापक यांचे खुद्द परिवहन मंत्र्याकडे साकडे
वणी : संतोष बहादुरे
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन वेगवेगळे रूप धारण करीत असताना वणी आगार व्यवस्थापकांनी थेट मंत्र्यांना निवेदन देत आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार उगारावी असा सोज्वळ सल्ला देत अनोखी मागणी केली आहे.
सध्या पूर्ण राज्यामध्ये एसटी कामगार यांनी काम बंद पुकारला आहे. यामध्ये त्यांची मुख्य मागणी रा. प महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावी अशी असतांना कामबंद आंदोलनामुळे वणी येथील बारा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वणी येथील आंदोलनातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक मताने ना. अनिल परब अध्यक्ष तथा परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य व मा. विभाग नियंत्रक यवतमाळ विभाग आणि महाराष्ट्र कामगार आयुक्त मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनातून आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अशी अनोखी मागणी केली आहे . निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक दबावामुळे जीवितास हानी झाली तर यास शासनाने जबाबदारी स्वीकारावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे निवेदन खुद्द वणी आगार व्यवस्थापकाने दिल्याने शासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.