जागतिक शौचालय दिनी कोलगावात पार पडला, सार्वजनीक शौचालयाचा भूमिपूजन सोहळा...
शासन प्रशासनासी समन्वय साधत गावाला शास्वत विकासाच्या पाऊल वाटेने पुढे नेऊ - सरपंच अभिषा निमसटकर.
स्वच्छ भारत मिशन अभियानाला यशस्वी करण्याबरोबरच गावात कोविड 19 चे शंभर टक्के लसीकरण झालेच पाहिजे, हा मान कोलगाव ग्रामपंचायतीने मिळवावा - गटविकास अधिकारी संजय वानखेडे.
मारेगाव - प्रतिनिधी
जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधत स्वच्छ भारत मिशन अभियानाचे अंतर्गत मारेगाव तालुक्याचे कोलगाव येथे कार्तिक एकादशी शुभ दिनाचे दिवशी (19 नोव्हेंबर) तीन लक्ष रुपये किमतीच्या सार्वजनिक शौचालयाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
आयोजित भूमिपूजन सोहळयाला मारेगाव तालुक्याचे न्यायदंडाधिकारी तथा तहसीलदार आदरणीय पुंडे साहेब तसेच मारेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी माननीय संजयजी वानखेडे साहेब यांची विशेष उपस्थिती होती.
विशेष म्हणजे गावातीलच वयोवृद्ध महिला श्रीमती बहिणाबाई गणपत बलकी या वृद्ध महिलेच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आयोजीत सोहळ्याचे वेळी, स्वच्छ भारत मिशन अभियानाला यशस्वी करण्याबरोबरच, गावासह परिसरातुन कोविड 19 या महाभयंकर रोगाला संपविण्यासाठी गावात शंभर टक्के लसीकरण झालेच पाहिजे. हा मान कोलगाव ग्रामपंचायतीने मिळवावा असे आवाहन, मारेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय वानखेडे यांनी ग्रामस्थांना केले.
तर... शासन प्रशासनासी समन्वय साधत गावाला शास्वत विकासाच्या पाऊल वाटेने पुढे नेऊ अशी ठाम भुमिका सरपंच अभिषा निमसटकर यांनी व्यक्त केली.
आयोजीत सोहळ्याला पंचायत समिती मारेगांवचे गटसमन्वयक प्रदीप बोके, जलजिवन मिशनचे अभियंता दिनेश मंदे, सुरज निमसटकर तथा ग्रामपंचायत सचिव अमन रामटेके, सरपंच अभिषा राजु निमसटकर, उपसरपंच प्रदीप वासाडे, ग्रामपंचायत सदस्य जया जुनगरी, रवींद्र आत्राम, गुरुदास घोटेकर यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.