Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना प्रशासनाचीही हुलकावणी...म्हने , दोनच मंडळात अतिवृष्टी !

🔸तीन मंडळातील हजारो शेतकऱ्यांना बसणार फटका
🔸दोनच मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ
🔸लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
मारेगाव : कैलास ठेंगणे
मारेगाव तालुक्यातील पाच महसूल मंडळापैकी दोनच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केल्याने इतर तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे .त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची शेतकरी करीत आहे.
मारेगाव तालुक्यामध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ माजविला आहे. अजूनही पावसाचा कहर सुरूच आहे. हातातोंडाशी आलेले पिके गेल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीस आला असतानाही शासनाच्या चुकीच्या काम करण्याच्या  फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
तालुक्यातील मारेगाव ,बोटोनी (जळका), मार्डी, कुंभा ,वनोजा देवी असे पाच महसूल मंडळांतर्गत  आहे .खरीप हंगामाच्या सुरुवाती पासूनच म्हणजे ऑगस्ट ते आक्टोंबर महिन्यापर्यंत पावसाने तालुक्‍यात चांगलाच हाहाकार घातला. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना मोठा फटका बसला . त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले .कपाशी पिकाची बोंडे काळवंडली. सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले .त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कार्यालय धाव घेत  हजारो तक्रारी दाखल केल्या असताना केवळ दोनच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची बाब समोर आल्याने इतर मंडळातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा घाट असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे २४ तासात ६५ मिमी पाऊस झालेल्या  मंडळातील शेतकरी मदतीसाठी पात्र राहतील .असा शासनाचा निर्णय आहे. शासनाला हवी असलेली पावसाची नोंदणी २४ तास झाली नसली तरी त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान शेतकऱ्याची झाले आहेत .त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी जागे होऊन शेतकऱ्यांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडाव्या अशी माफक अपेक्षा शेतकरी करीत आहे.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संजय निकाळजे यांनी ' विदर्भ सर्च न्यूज ' बोलतांना सांगितले.


शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटण्याचा सावकाश प्रयत्न चालविला आहे.यंदाच्या पावसाने वणी उपविभागातील सर्वकश शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला असल्याने सर्व्हे करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत दयावी अन्यथा मनसे शिलेदार बांधावर जाऊन शासनाकडे अहवाल देईल.मदतीला विलंब झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी विदर्भ सर्च न्यूज शी बोलतांना दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies