🔸पीडितेची पोलिसात तक्रार
🔸अर्जुनी येथील युवकावर अत्याचार व अँट्रासिटीचा गुन्हा व अटक
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथील किरायाने राहत असलेल्या महिलेसोबत अँटो चालकाची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन जबरीने शारिरीक सबंध प्रस्तापित करणाऱ्या युवका विरुद्ध पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानें तालुक्यातील अर्जुनी येथील युवकावर लैंगिक अत्याचार व अँट्रासिटीचा गुन्हा मारेगाव पोलिसात आज सोमवारला साडेपाच वाजताचे दरम्यान दाखल करण्यात आला.परिणामी संशायीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाड्याने असलेल्या २७ वर्षीय महिला राज्य महामार्गावर स्टेशनरी व्यवसाय करायची.सन २०११ मध्ये म्हैसदोडका येथील युवकासोबत विवाह केलेली महिला ही विभक्त राहायची.तिच्या सोबत तिची मुलगीही असतांना मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील अर्जुनी येथील कुणाल दशरथ गोडे (२६) यांच्यासोबत तिची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.या युगुलांचे प्रेम बहरत असतांना मुक्काम पोस्ट " रुम " असा प्रकार नित्याचाच झाला होता.
दरम्यान , वेगवेगळे आमिष दाखवीत सबंध प्रस्थापित करणाऱ्या युवकाने पिडितेच्या लग्नाच्या मागणीला सपशेल नकार देऊन सातत्याने अत्याचार केल्याची तक्रार घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले.तक्रारीची गंभीर दखल घेऊन संशायित आरोपी कुणाल दशरथ गोडे रा.अर्जुनी यांचेवर अत्याचारासह अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. परिणामी वृत्त लिहिस्तोवर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार , ठाणेदार राजेश पुरी यांचेसह पोलीस पथक पीडित महिलेच्या घटनास्थळी दाखल झाले होते.