🔹️सरोदी समाज संघटनेचा पुढाकार
वणी : संतोष बहादुरे
वणी येथे प्रथमच सरोदी समाज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २५ तारखेला गोकुळ नगर , हनुमान मंदिरात होणाऱ्या शिबिरात आपल्या रक्ताचा एक एक थेंब, एखाद्या व्यक्तीचे जीवनदान ठरू शकते या उदात्त हेतूने प्रथमच सरोदी समाजाने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सदर रक्तदान शिबिरात हजारोच्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सरोदी समाज संघटनेचे अध्यक्ष रामसेवक मोरे सचीव अंकुश माफुर वणी शाखा .अध्यक्ष शंकर घोगरे . सुभाष वाघडकर नगरसेवक. दिपक मोरे नागोजी आतमंगल गोकुळ नगर यांनी केले आहे.