🔸मारेगाव येथे आंतरराष्ट्रीय ई- परिषद
मारेगाव : दीपक डोहणे
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना स्वातंत्र्य समयी विविधांगी समस्या अस्तित्वात होत्या.या भयावह विदारक परिस्थितीत देशाने मार्गक्रमण करीत मोठी प्रगती केली.या प्रगतीत एक घटकाचे योगदान नसून अनेक घटक अंतर्भूत आहे.यात स्त्री हा घटक महत्त्वाचा आहे .स्त्री या घटकांचे विचारमंथन व्हावे व प्रत्येक क्षेत्रात त्यांची भागीदारी अनिवार्य असेल तरच देश महासत्तेकडे कूच करेल असा आशावाद डॉ. किरणदिप कौर यांनी व्यक्त केला.
त्या मारेगाव येथील कला- वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतराष्ट्रीय इ- परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.संत गाडगेबाबा विद्यापीठाचे इतिहास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बनसोड हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.डॉ. संदेश वाघ सत्राचे प्रमुख मार्गदर्शक होते.
तीन दिवस चाललेल्या परिषदेत डॉ. कौर पुढे म्हणाल्या ,विधानसभा, विधान परिषद,लोकसभा, राज्यसभा येथे स्रियांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळायला पाहिजेत.देशाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना संधी दिली गेली पाहिजे. असे झाले तर देेेश लवकरच महासत्ता बनेल.यावेळी परिषदेत देश विदेशातील अनेक संशोधक उपस्थित होते.
येथील महाविद्यालयातील नऊ विभागाकडून परिषदेचे आयोजन प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या सत्राचे प्रास्ताविक डॉ. गजानन सोडणार यांनी केले.डॉ.विजय भगत यांनी सूत्रसंचालन केले.