🔸मारेगाव येथे पक्ष प्रवेश सोहळा
🔸गगनभेदी फटाक्यांची आतषबाजी अन मनसे जिंदाबाद च्या घोषणाबाजी ने मारेगावकर दणाणले
🔸मनसे कडे रिघ हे परिवर्तनाचे द्योतक-राजू उंबरकर
विदर्भ सर्च न्यूज । दीपक डोहणे
मारेगाव (१०.ऑक्टो ) आगामी निवडणुकीचे वारे मारेगाव तालुक्यात वेगाने वाहत असतांना मनसेकडे इंनकमिंग सुरू झाली.शनिवारी मारेगाव येथे पक्ष प्रवेश सोहळ्यात तालुक्यातील इतर पक्षांना खिंडार पाडीत जवळपास ३०० वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.या जम्बो कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने इतर राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहे.परिणामी उंबरकर यांचे आगमन होताच मार्डी चौकात स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बँड,ढोलताशे सह गगनभेदी फटाक्यांची आतषबाजी व मनसे जिंदाबादच्या घोषणांनी मारेगावात मनसेमय वातावरण तयार झाले होते.
यावेळी जम्बो कार्यकर्त्यांच्या रॅली चे सर्वत्र लक्ष वेधून घेत होते.घोंसा रोडवर प्रभाग क्रमांक आठ मधील गजानन चंदनखेडे, विनोद बदकी,शब्बीर खान पठाण ,शोभा चंदनखेडे, वंदना बदकी, नलिनी बदकी यांनी राजू उंबरकर यांचे शाल श्रीफळ देऊन गौरव केला.
स्थानिक बदकी भवन येथे पक्ष प्रवेश सोहळ्याच्या मंचावर राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर , जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , धनंजय त्रिंबके , अविनाश लांबट , फाल्गुन गोहोकार , नबी शेख , आरती राठोड , सिंधू बेसकर , अनंता जुमडे, रुपेश ढोके , लाभेश खाडे , चांद बहादे, किशोर मानकर , जमीर सय्यद , अजय पवार , अजय वासेकर , शशिकांत बोढे , गजानन चव्हाण , गौरव कोवे , संतोष राठोड , रमेश कोल्हे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना उंबरकर यांनी विद्यमान राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र शेतकऱ्यांचे सोयरसुतक नसल्याने मदतीचा ओघ नाही त्यामुळे कायम बळीराजा दुर्लक्षित आहे.शिवसेना ज्यांची प्रेरणा आहे त्यांनी सत्तेसाठी तडजोड केली. ही महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी बिघाडी ठरली आहे. आपल्या मतदारसंघात लोकप्रतिनिधीचे अनेक परीवर्तन झाले.मात्र उपयोग शून्य आहे.कोविड व इतर न्यायिक अपेक्षेने नागरिक मनसे कडून अपेक्षा करतोय त्याची पुर्तताही काही प्रमाणात आम्ही करतोय त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येण्याचा ओघ वाढलाय ही जनतेची रिघ या मतदारसंघात नव्या परिवर्तनाचे द्योतक आहे.आम्ही जनतेचे सदैव कार्य करतोय तेव्हा न्याय निश्चित मिळतोय. येणारा काळ सकारात्मक दिशा ठरवेल असा आशावाद यावेळी राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्यात तालुक्यातील इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नव्या घराची वाट शोधत जवळपास ३०० जणांनी मनसेमध्ये प्रवेश केला .यात मार्डी, चिंचमंडळ, देवाळा , कुंभा, खडकी, अर्जुनी, पहापळ, धामणी ,वागदरा, भालेवाडी, कोलगाव, हिवरा मजरा, खडकी, बुरांडा व मारेगाव शहरासह जवळपास 300 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष रमेश सोनूले ,प्रास्ताविक गोविंदजी थेरे तर निखिल मेहता यांनी आभार मानले.

