शिवनाळा येथे १५१ लोकांनी घेतली लस
प्रतिनिधि:- राहुल आत्राम
आदिवासी बहुल तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या शिवनाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे आज दिनांक २२/९/२०२१ रोजी बुधवार ला को व्याकसिंन लसीकरण भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकार च्या मोहिमेला प्रतिसाद देत शिवनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरिपोड तलावपोड तेलाई पोड येथील १५१ लोकांनी लस घेतली.
यावेळी आरोग्य सेविका एम.डब्ल्यू. कोकुडे आरोग्य सेवक आर.के.मेश्राम आशा सुपरवायझर वी.आर.बोंडे डाटा आपरेटर.हेमंत दानव सचिव सुनंदा आत्राम सरपंच.शशिकला आत्राम तलाठी श्री. कनाके साहेब मुख्यधापक श्री. सुंकुरवार सर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वाहन चालक आत्राम आणि समाज सेवक हरिदास रामपुरे यावेळी उपस्थित होते