*किन्हाळा शाळेतील शिक्षिकेंचा गौरव*
-म.फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमांची भेट
- शिक्षक दिनाचे औचित्य
मारेगाव। : दीपक डोहणे
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्हाळा येथील पालकांनी कार्यरत दोन्ही शिक्षिकेंचा गौरव केला.
येथील शिक्षिका स्मिता देशभ्रतार ( पुनवटकर)व चित्रा डहाके यांनी मागील तीन वर्षांपूर्वीपासून शाळेचा शैक्षणिक कायापालट करून कोरोना काळातही मुलांचा शैक्षणिक प्रवाह कायम ठेऊन सर्वांगीण सकारात्मक बदल केला.याची पालकांनी दखल घेत दोन्ही शिक्षिकेंना गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देण्यांत आली.कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयार केलेले शुभेच्छापत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णुदास आडे होते.नानाजी आसेकर,सरपंच शुभम भोयर,अरुण डांगाले,बंडू क्षीरसागर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.निमिषा देठे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन अमृता काकडे तर आभार स्वाती शास्त्रकार यांनी मानले.
"" आमचा केलेला गौरव ही कृतज्ञतेची व विश्वासहार्ताची पावती आहे.पालकांनी केलेला गौरव आम्ही शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजतोय.प्रांजळ पणाने केलेल्या कार्याचा हा गौरव असून सुजाण पालक वर्गाच्या शैक्षणिक जागृतीला आणि कृतज्ञतेला आम्ही नतमस्तक आहे ""
स्मिता देशभ्रतार - मुख्याध्यापीका
चित्रा डहाके - सहाय्यक शिक्षिका
जिल्हा परिषद शाळा , किन्हाळा