🔹 प्रसिद्ध साहित्यिक प्रा.अशोक राणा उदघाटक
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगाव, (३० सप्टें.) तालुक्यातील जनतेचा वैचारिक व बौद्धिक प्रगल्भतेत कमालीचा उच्चांक वाढविण्यासाठी आणि पुस्तक प्रेमी वाचकांकरिता मारेगाव शहरात नव्यानेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन येत्या ०३ तारखेला होत आहे. प्रसिद्ध लेखक ,विचारवंत - साहित्यिक प्रा.अशोक राणा वाचनालयाचे उदघाटक असून वणी येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब राजूरकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहणार आहे.
शहरातील क्रांती चौक , माधवनगर - प्रभाग क्र.६ मध्ये सुरू होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय ही वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे.या वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह थोर पुरुषांचे समग्र वाङमय पुस्तके,कायदा,धर्मशास्त्र, चरित्रे,अर्थशास्त्र, तत्वज्ञान, युद्धशास्र,यासह विविधांगी तत्वनिष्ठ ,वैचारिक व बौद्धिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध राहणार आहे.
अलीकडे काळाच्या प्रवाहात वाचनाची आवड लुप्त होत असताना ज्ञानाची मोठी ताकद केवळ ' शब्दात ' च असते.या ताकदीचे शब्द केवळ वाचनातून मिळतेय.इतरत्र माहिती मिळविणे हा नविन ट्रेंड झाला असून यातून मागे पडणार नाही यासाठी परिसरातील वाचकांचा कल तपासूनच येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची सुबक कल्पनेचा अंमल होत आहे.वाचकांना " ग्रंथ " जीव की प्राण तत्वज्ञाणी बनण्याचा इवल्याश्या प्रयत्नाला पूर्णरुप देण्यासाठी येथील वाचनालय अध्यक्ष बाबाराव ढवस,उपाध्यक्ष दिगांबर दयने, सचिव लीलाधर चौधरी ,सहसचिव प्रवीण लोंढे,विजय झाडे,हेमराज कळंबे,मोहन ठाकरे,मंगेश गवळी,प्रकाश रोकडे आदी प्रयत्नशील आहेत.