भूमिअभिलेख प्रशासनाच्या प्रभारी उपअधिक्षक पदी बबनराव सोयाम
मारेगाव : दीपक डोहणे
येथील भूमिअभिलेख उप अधीक्षक संजय पवार हे प्रकृतीने दीर्घ रजेवर गेल्याने मारेगाव भूमिअभिलेख कार्यालयाच्या प्रभारी उप अधीक्षक पदाचा भार येथील मुख्यालय सहाय्यक बबनराव सोयाम यांचेकडे सोपविन्यात आला आहे.
मागील अनेक वर्षापूर्वी पासून मुख्यालय सहाय्यक म्हणून पारदर्शक प्रशासनाचा गाडा हाकत असतांना जनमानसात कामकाजा मध्ये वेगळीच छाप पाडली आहे.येथील उपअधीक्षक संजय पवार तूर्तास दीर्घ रजेवर गेल्याने येथील मुख्यालय सहाय्यक बबनराव सोयाम यांचेकडे उपअधीक्षक चा पदभार आज सोमवार ला देण्यात आला.त्यांच्या नियुक्तीचे सर्व सामान्य जनतेच्या कामाची दखल घेऊन नियमित कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.