कँनल रस्त्यावर जीवघेणा खड्डा
🔹 शेतकऱ्यांचा जीव मुठीत
🔹 प्रशासनाच्या दुर्लक्षाने संतापाची लाट
विदर्भ सर्च न्यूज
मारेगाव :- संतोष बहादुरे
कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्याच्या उत्पादनात कमालीचा बदल होऊन त्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था म्हणून कालव्याची निर्मिती केली.मात्र कालव्याचे रस्तेच आता जीवघेणे ठरू पाहत आहे.मोठमोठ्या खड्ड्याने येजा करणे दुरापास्त होत असून प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळत आहे.
मारेगाव तालुक्यातील कोलगाव वेगाव रस्त्याच्या पूर्व दिशेला कँनल आहे.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने ही निर्मिती केली आहे.मात्र कॅंनल रस्त्याच्या दुतर्फाने शेकडो हेक्टर शेतजमीन आहे.रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन येजा करावे लागते आहे.या खड्ड्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान साधून हा खड्डा रस्त्याच्या समांतर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.