🔹 पांढरकवडा येथील कार्यक्रमात एकमताने निवड
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगाव, (२९ सप्टें.) पांढरकवडा येथील कार्यक्रमात कोलाम समाजाच्या बैठकित समाज संघटनेची मोट बांधण्यात येऊन या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील रहिवासी राहुल आत्राम यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्षस्थानी लेतूजी जुनघरे होते.नागपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ जांभुळकर,डॉ.आत्राम अकोला, माजी मुख्याधिकारी मानकर,पांढरकवडा डॉ.टेकाम , अधीक्षक मारेगावकर,प्रकाश घोटेकर,वर्धा जिल्हाध्यक्ष मेटकर, क्षयकिरण अधिकारी कैलास जुनघरे,चंद्रपूर येथील ताई चांदेकर,सरपंच लक्ष्मण देवतळे, संदीप कोवे , ज्ञानेश्वर आस्वले,पैकुजी आत्राम,तुळशीराम कुमरे ,संजय टेकाम,मांगरुळकर सर , सेवानिवृत्त गटविकास अधिकारी घसाळकर , गंगाधर लोणसावळे,विजय ढोबरे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी कोलाम समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठीत करून समाजाला एकसंघ ठेवण्यावर विचारविमर्श करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील नाईक,महाजन, घटया कारभारी,सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व माजी सैनिक यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात समाजाची जिल्हा कार्यकारिणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात येऊन यात जिल्हाध्यक्ष म्हणून राहुल आत्राम , जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन आत्राम,सचिव गणेश आत्राम,यांची एकमताने निवड करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश मुंडाले,गंगाधर आत्राम,सूनिल टेकाम, मारोती आत्राम,अर्जुन आत्राम,अक्षय आत्राम, हुसेन ढोबरे,हरिभाऊ रामपुरे, बाळू कासार, कैलास आत्राम,दीपक आत्राम,विलास कुमरे,प्रशांत टेकाम आदींनी पुढाकार घेतला.