जिल्ह्यात ब्रेक द चैन अंतर्गत नवीन निर्बंध लागू
पोळा सणा करीता कोवीड नियमावली
सणा सूदीचा पार्शभुमिवर जिल्हात नविन नियमावली दि 6 व 7 सप्टेंबर ला पोळा हा सण साधेपणाने घरीच साजरा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी यानी जनतेस दिले .
जिल्ह्यात पोळा मारबत व तान्हा पोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते. दिनांक 6 सप्टेंबर ,7 सप्टेंबर 2021 रोजी पोळा व तान्हा पोळा , मारबत साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आव्हान, तसेच सदर सन साजरा करतानी सर्वांनी मास्क लावणे सामाजिक अंतर,सॅनीटायझर चा वापर करावा. व covid-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे .
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा शहरात बैलपोळा भरण्यात येणार नाही. याची जिम्मेदारी स्थानिक प्रशासनाने घ्यावी व सर्वांनी बैलपोळा घरीच साजरा करावा. तसेच जिल्ह्यात मारबत व ताना पोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो यावर्षी मारबतिची निवडणूक काढू नये .त्याच प्रमाणे बैलपोळा निमित्त होणाऱ्या बैल सजावट स्पर्धा किंवा मिरवणुका जत्रा यावर बंदी घातली आहे.
काही धार्मिक विधी मध्ये जास्तीत जास्त पाच लोकांची उपस्थिती घरगुती स्वरुपात असावी.
कोविड नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई संबदित प्रशासनाने करवी असे निर्देश जिल्हाधिकारी यानी दिले