🔹शैक्षणिक क्षेत्रात शोककळा
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अनिल बाबाराव ताजने (५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वणी स्थित राहत्या घरी आज गुरुवारला पहाटे निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात प्रारंभी पासून सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यांना बढती मिळून त्यांनी मुख्याध्यापक पदाची यशस्वी सूत्रे सांभाळलीत. पुढील मार्च मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते.मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील गिरजाबाई ताजने व वणी तालुक्यातील मंदर येथील शाळा संस्थेचे ते अध्यक्ष होते.
मागील दहा दिवसापूर्वी प्रकृती अस्वस्थाने त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.प्रकृतीत कमालीची सुधारणा झाल्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला होता.बुधवारला ते मारेगाव येथील शाळेत किमान दोन तास थांबून कामकाज केले.गुरुवारला पहाटे झोपेत असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रातील प्रचंड नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
श्री.अनिल ताजने यांच्या पश्चात वृद्ध आई -वडील ,एक भाऊ ,एक बहीण ,पत्नी , मूलगी मोना व मुलगा हेमंत असा आप्तपरिवार आहे.ताजने सर यांच्यावर वणी येथील स्मशानभूमीवर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.