सुगंधित तंबाखूचा आता घरून पुरवठा
- मनसेचे शिलेदार आहे दबा धरून
- व्यापारात चिंतेचे सावट
मारेगाव। : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्यात सुगंधित जर्दा तंबाखु नावाचा गोरखधंदा आणि कहर माजला आहे.येथील व्यापाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दराने खेळखंडोबा चालविला असतांना मनसे कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली.शहरात व ग्रामीण भागात विक्री कमी केली.दरम्यान हा साठा एक विशिष्ठ ठिकाणी ठेवून विक्री केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यानुसार मनसे कार्यकर्ते आता दबा धरून बसले आहे.कुठल्याही क्षणी व्यापाऱ्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्याची व्युव्हरचना आखण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत दहशतीचे सावट दिसत आहे.
मारेगाव तालुक्यात सुगंधित जर्दा तंबाखु च्या नावाखाली सर्रास बेहिशोबी वारेमाप विक्री सुरू आहे.शहरासह ग्रामीण भागातील सर्वच वर्गात गुटखा सह सुगंधित तंबाखु युक्त खर्रा चालविल्या जातो यावर प्रशासनाचे अर्थपूर्ण संबंध कारणीभूत ठरत जनता व्यसनाधीन होऊन व्यापारी गलेलठ्ठ होत आहे.शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गर्भित इशाऱ्याने व्यापारी वर्गांनी हा सुगंधित तंबाखू सह हुक्का तूर्तास दुकानातून विकण्यास फुलस्टॉप दिला तर जवळीक व हितसंबंध असलेल्या ग्राहकांना आता सुगंधित तंबाखू थेट घरून व एका निर्जन स्थळावरून दिल्या जात आहे.
परिणामी मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि शिलेदारांनी आता विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मागोवा घेत दबा धरून बसले आहे.अवघ्या दिवसात रंगेहात पकडून जिल्हास्थळी हवाली करण्याचे मनसुबे आखले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत कमालीची दहशत पसरली असून लघु व्यवसाय धारकांनी आखडता हात घेत सुरक्षित अंतर ठेवला आहे.या पुढे सुगंधित गोरख व्यवसाया वर कायम पायबंद नाही बसला तर मनसे स्टाईल लवकरच कृतीत उतरविण्याची व्युव्हरचना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे व तालुका अध्यक्ष रमेश सोनूले यांनी आखली आहे.त्यामुळे येणाऱ्या अवघ्या दिवसात व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पडणार एवढे मात्र निश्चित..!