कपाशी, सोयाबीन पिकांवर कीडीचे आक्रमण : कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून मार्गदर्शन नाही
यवतमाळ : गेल्या वर्षी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने कपाशी, सोयाबीन पिकाची लागवड केली. पीक वाढत असताना पिकावर बोंडअळी, मावा, तुडतुडा आदी कीड प्रकारांनी आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करताना दिसतात.
जिल्ह्यातील शेतकर्यांची संपूर्ण मदार ही खरीप हंगामातील पिकावर असते. मागील काही वर्षापासून खरीप हंगामच शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. यंदाही शेतकर्यांनी कर्जबाजारी होत पिकांची लागवड केली. पिकांची वाढ होत असताना किडीने आक्रमण केले. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. मात्र, त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जाते. कृषी केंद्र चालक आपल्याच मर्जीप्रमाणे शेतकर्यांना औषधी देतात. त्याचाही फटका शेतकर्यांना बसत आहे. या संकटात शेतकरी कृषी विभागाच्या अधिकार्यांना फोन करून मार्गदर्शन
माग
त आहे. परंतु, कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षी बोंडअळीमुळे नुकसानीची मदत मिळाली नाही. त्यामुळे आत्महत्या करायची का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
