निधन वार्ता
प्रकाशचंदजी भंडारी यांचे हृदय विकाराने वयाच्या ७८वर्षीय निधन
सचिन मेश्राम
मरेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथील रहिवासी प्रकाशचंदजी नेमीचंलजी भंडारी ,वयाच्या ७८वर्षीय शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना अचानक शेतामध्ये हृदय विकाराचा झटका आल्याने शेतातील असलेल्या मुलाने वणी येथील रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय
अधिकारी यांनी तपासणी केली असता प्रकाशचंदजी यांची प्राणज्योत मावळली असल्याचे सांगितले लगेच वनोजा देवी येथे प्रकाशचंदजी यांना घरी आणून त्यांच्यावर पार्थिवावर वनोजा देवी येथे आज दुपारी मोक्षधाम येथे प्रकाशचंदजी यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुली आणि एक मुलगा शोभाबाई भंडारी, सपना कोठारी, सुषमा दुगड, प्रतिभा तातेड, मुलगा प्रशांत भंडारी सुन चेतना भंडारी असा आप्त परिवार आहे. पाठिमागे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिभाताई तातेड यांचे ते वडील होय.